Posts

Showing posts from April, 2021

काय आहे कॅनडा कॉर्नर चा इतिहास

काय आहे कॅनडा कॉर्नर चा इतिहास  धुनकरबार्इ ते कॅनडा हॉस्पिटल! नाशिक शहराच्या जडणघडणीत वेळोवेळी निर्माण झालेल्या आरोग्यसेवा, सुविधा देणाऱ्या संस्था महत्त्वाची भूमिका पार पाडताना दिसतात... नाशिक शहराच्या जडणघडणीत वेळोवेळी निर्माण झालेल्या आरोग्यसेवा, सुविधा देणाऱ्या संस्था महत्त्वाची भूमिका पार पाडताना दिसतात. यात नाशिकचे कॅनडा हॉस्पिटलही आहे. हे हॉस्पिटल आता नसले तरी त्या नावाने शहरातील महत्त्वाचा चौक निर्माण झाल्याने याबद्दल अनेकांमध्ये उत्सुकता आहे. कॅनडा हे नाव या चौकाला का पडले, ते कोठे होते, त्यापूर्वी तेथे काय होते अशा प्रश्नांची उत्तरे या अल्बममधून. नाशिकच्या प्रत्येक चौकाला एक इतिहास आहे आणि त्या इतिहासामागे शहराची जडणघडण कशी होत गेली याचा रोचक प्रवास. हा प्रवास विस्मृतित गेला आहे अथवा इतिहासाच्या पानांमध्ये दडला आहे. तो अनेकदा आपल्याला अस्वस्थ करतो. शरणपूर रोडवरील कॅनडा कॉर्नर हा चौक आता नाशिकचा महत्त्वाचा चौक आहे. पण, कॅनडा हे नाव या चौकाला कसं पडलं असेल, हा प्रवास गंमतीशीर आहे. कॅनडा कॉर्नर येथील सध्या बीएसएनएल ऑफिस आहे, तेथे पूर्वी धुनकरबार्इ हॉस्पिटल एका खासगी संस्थेकडू...