कंगनाने साधला जो बायडेन यांच्यावर निशाणा; म्हणाली हे तर ‘गजनी’

 मुंबई : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूकची सध्या जगभरात चर्चेत होत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करत जो बायडेन विजयी ठरलेत. लवकरच बायडेन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पदभार स्विकारतील. दरम्यान,भारतीय-अमेरिकी वंशाच्या कमला हॅरिस या उपराष्ट्रपती म्हणून निवडून आल्या आहेत.


या निवडणुकीच्या निकालानंतर जगभरातून प्रतिक्रिया येत आहेत यातच आता कंगना रनौतने देखील आपलं मत व्यक्त केलं आहे. कंगनाने केलेल्या सोशल मिडीयावरील पोस्त मध्ये तिने बायडेन यांना गजनीची उपमा दिली आहे. तर कमला यांच्यावर स्तुतिसुमने उधळली आहेत. गजनीमध्ये आमिर खान यांच्याप्रमाणे दुसऱ्या क्षणाला बायडेन सर्व विसरुन जातात, असं कंगनाला सांगायचं आहे.


ती लिहिते,गजनी बायडेन यांच्याबद्दल मी शुअर नाही..ज्यांचा डेटा प्रत्येक 5 मिनिटाला क्रॅश होतो. इतक्या औषधांचे इंजेक्शन त्यांच्यामध्ये इंजेक्ट करण्यात आले आहे, की ते 1 वर्षाहून जास्त काळ टिकू शकणार नाही. त्यामुळे हे स्पष्ट आहे की, कमला हॅरिसच शो पुढे चालवतील. जेव्हा एक महिला उठते तेव्हा ती दुसऱ्या महिलेसाठी रस्ता तयार करते. या ऐतिहासिक दिवसासाठी चिअर्स!

Popular posts from this blog

How to reach Shirdi

SAI HERITAGE VILLAGE

Software Development