इलेक्ट्रिक वाहनांची किंमत कमी करावी नितीन गडकरींचे उत्पादकांना आवाहन…

 नवी दिल्ली – फिक्कीने आयोजित केलेली ‘इलेक्ट्रिक मोबिलिटी कॉन्फरन्स २०२०’ पार पडली यावेळी येत्या काळात पारंपारिक इंधनाची भासत असलेल्या तुटवडा लक्षात घेत तसेच प्रदूषण नियंत्रणासाठी इलेक्ट्रॉनिक वाहनांचा वापर करणे गरजेचे आहे यावर चर्चा करण्यात आली. यावेळी बोलताना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी वाहन उद्योगाने इलेक्ट्रिक वाहनांची किंमत कमी करावी, असे आवाहन केले. सरकारकडून जीएसटी सवलतीसह इतर अनुदान देत इलेक्ट्रिक वाहन उत्पादकांना सहाय्य केले जात असल्याचेही गडकरी यांनी म्हटले आहे.

गडकरी वाहनांच्या किमती परवडणाऱ्या दरात करण्यासाठी वाहन उत्पादक संशोधन आणि विकास करू शकतात. त्यांनी आता इलेक्ट्रिक वाहनांची किंमती करण्याची गरज आहे. मात्र, ते किमती कमी करण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढत नाही. जर इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादकांकडून मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात आले नाही तर, उत्पादनाच्या खर्चात कपात होणार नाही. कुठेतरी आपण सुरुवात करण्याची गरज आहे. सरकारकडून तुम्हाला जीएसटी सवलत व अनुदान देण्यात येते. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहन उत्पादकांना वाहनांच्या किमती करणे शक्य आहे, असा त्यांनी उद्योजकांना सल्ला दिला.

इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराने हवेचे प्रदूषण टळणार आहे. भारत कच्चे तेल आणि नैसर्गिक वायुच्या गरजेसाठी ८० टक्के आयात करतो. त्यासाठी लागणाऱ्या विदेशी चलनाचे प्रमाण हे इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराने कमी होऊ शकते.

दरम्यान, ई-स्कूटरचे उत्पादन प्रकल्प सुरू करण्यासाठी ओलाकडून विविध राज्य सरकारांशी चर्चा सुरू आहे. यामध्ये महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्रप्रदेश व कर्नाटक या राज्यांचा समावेश आहे. बजाज ऑटो, हिरो मोटो कॉर्पची मालकी असलेली एथरएनर्जी, हिरो इलेक्ट्रिक या कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन सुरू केले आहे. ओलानेही इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन घेतल्यास या क्षेत्रात तीव्र स्पर्धा होण्याची शक्यता आहे.

Popular posts from this blog

How to reach Shirdi

SAI HERITAGE VILLAGE

Software Development