पोस्टाने जाहीर केली मोठी स्कीम! फक्त २०० रुपये भरून मिळवा २१ लाख रुपये

 दिल्ली । ज्यांना सध्या पैसे गुंतवणूक करून त्याचा चांगला मोबदला घेयचा आहे त्यांच्यासाठी पोस्टाची एक जबरदस्त स्कीम आहे. या स्कीमच्या माध्यमातून दररोज एक निश्चित रक्कम सेव्ह केल्यानंतर तुम्ही काही वर्षातच लखपती बनाल.


यासाठी फक्त २०० रुपयांची बचत करायची आहे. अशा प्रकारच्या खाजगी देखील स्कीम असतात. मात्र ही स्कीम वेगळी असून येणाऱ्या आयुष्यात याचा तुम्हाला फायदा होणार आहे.



 

पोस्ट ऑफिसच्या पब्लिक प्रोविडेंट फंड अकाउंट म्हणजेच पीपीएफ हा सद्यस्थितीचा बचतीचा एक उत्तम पर्याय आहे. तुम्हाला तुमच्या या अकाउंटमध्ये रोज दोनशे रुपयांची बचत करायची आहे. जर तुम्ही रोज हे करू शकला, तर स्किम संपेपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये 21 लाखांचा फंड जमा झालेला असेल.


यासाठी पोस्ट ऑफिसच्या देशभरातील कोणत्याही शाखेत तुम्ही हे अकाउंट ओपन करू शकता. दोन व्यक्ती मिळून सुद्धा हे अकाउंट तुम्ही ऑपरेट करू शकता. ही एकदम साधी आणि सरळ पद्धत आहे.


तुमचे सध्याचे वय 25 वर्षे आहे आणि तुम्ही आजपासून आपल्या दैनंदिन जीवनातील रकमेतील दोनशे रुपये रुपयांची बचत करत आहात. ही अशी बचत तुम्हाला पंधरा वर्ष करायची आहे. पंधरा वर्षानंतर तुम्हाला 21 लाखांचा मोबदला मिळणार आहे.


तुम्हाला हे अकाउंट ओपन करायचे असेल तर यासाठी फक्त तुम्हाला शंभर रुपये भरावे लागतील. याद्वारे तुम्ही तुमची बचत करू शकता. तुमच्या जवळच्या कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन अधिक माहिती घेऊन पैसे कमवू शकता.

Popular posts from this blog

How to reach Shirdi

SAI HERITAGE VILLAGE

Software Development