रक्त पातळ होण्यासाठी करा हा ‘आयुर्वेदिक’ घरगुती उपाय, रक्तात गुठळ्या होणार नाही
व्यायामाचा अभाव बाहेरचे खाणे, अवेळी झोपणे आणि इतर कारणांनी अनेकांना रक्त घट्ट होण्याची समस्याही निर्माण झालेली असते. जर आपल्या शरीरातील रक्त घट्ट झाले, तर त्या माध्यमातून रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. आणि त्यामुळे आपल्याला ब्रेन स्ट्रोक, हार्टअटॅक, मधुमेह यासारख्या आजारांना सामोरे जावे लागते.
त्यामुळे आपल्या शरीरातील रक्त आपल्याला नियमितपणे सुरळीत ठेवावे लागते. जर आपण रक्त सुरळीत नाही ठेवले तर आपला गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. यासाठी आपण काही घरगुती उपाय करून देखील यावर मात करू शकता. मात्र, अनेकांना याचा आजार जडल्याशिवाय याचे गांभीर्य कळत नाही.
तसेच रक्त घट्ट होण्यासाठी कारणीभूत असलेले घटक देखील अनेक जण सोडत नाहीत. रक्त घट्ट होण्याचे कारण म्हणजे आपण सातत्याने हाय कोलेस्टेरॉल युक्त अन्न खात असतो. यामुळे आपल्या शरीरातील रक्त हे घट्ट होते. बाहेरचे खाणे म्हणजे तेलकट तुपकट मसालेदार तिखट खाणे, तसेच जंकफूड खाणे, यामुळे देखील रक्त घट्ट होण्याची समस्या निर्माण होत असते.
रक्त घट्ट न होऊ देण्यासाठी आपल्याला चांगलीच कसरत करावी लागते.आपल्या शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत ठेवायचा असेल तर आपल्याला किमान रोज चार किलोमीटर पायी चालणे हे अतिशय आवश्यक असते. आपण एवढे अंतर रोज पायी चालत असाल तर आपल्याला कुठल्याही आजाराचा सामना करावा लागत नाही.
पायी चालण्याचे अनेक फायदे आहेत. पायी चालल्याने आपण आपली प्रतिकारशक्ती देखील वाढू शकतात. प्रतिकारशक्ती वाढली तर आपण वारंवार आजारी देखील पडणार नाहीत. मात्र, फिरण्याचे महत्त्व हे अनेकांना पटलेले दिसत नाही. रात्री उशिरा झोपणे आणि सकाळी उशिरा उठणे असा दिनक्रम आजच्या तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसत आहे. मात्र, काही तरूण याला अपवाद देखिल आहेत.
सकाळी लवकर उठून ते फिरण्यास जातात. मात्र, अशा तरुणांना या आजाराचा सामना करावा लागत नाही. मात्र, जे आळशी झाले आहेत अशांना या आजाराचा त्रास सहन करावा लागू शकतो. आज आम्ही आपल्याला रक्त पातळ करण्यासाठी एक घरगुती उपाय सांगणार आहोत. हा उपाय करून आपण रक्त पातळ करू शकतात. महागडी औषधे घेण्यापेक्षा हा उपाय कधीही केलेला चांगला.
1) हळद : हळद मध्ये मोठ्या प्रमाणात औषधी गुणधर्म भरलेले असतात. हळदी अँटी सेप्टीक म्हणून देखील वापरली जाते. त्यामुळे या उपायासाठी आपण हळद वापरणार आहोत.
2) अद्रक : अद्रक यामध्ये मोठ्या प्रमाणात पचनक्रिया वाढवणारे गुणधर्म भरलेले असतात. तसेच आद्रक खाऊन आपण आपले रक्त देखील सुरळीत ठेवू शकता.
3) लसुन : लसणामध्ये मोठ्या प्रमाणात औषधी गुणधर्म भरलेले असतात. लसूनाची एक पाकळी आपण रोज खाल्ली तर रक्तप्रवाह सुरळीत राहू शकतो. या उपासासाठी आपली लसून देखील लागणार आहे.
असा करा उपाय – एका वाटीमध्ये लसणाची एक पाकळी घ्यावी. अद्रकाचा थोडा तुकडा घ्यावा. त्यामध्ये हळद टाकावी. त्यानंतर हे मिश्रण चांगले कुटून घ्यावे. रात्री रोज झोपताना आपण जाऊन हे मिश्रण खावे. जेवण झाल्यानंतर हे मिश्रण खावे. असा प्रयोग काही दिवस आपण केल्यानंतर आपल्या शरीरातील रक्त पुरवठा हा नियमित आणि सुरळीत राहील आणि आपण कुठल्या आजाराला सामोरे जाणार नाही.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.